अम्ल क्षार सिंद्धांत हा पांचभौतिक चिकीत्सेतील म्हणजेच आयुर्वेदातील एक अत्यंत महत्वाचा सिद्धांत आहे. अगदीच याचे घरगुती उदाहरण द्यायच जर म्हटलं तर लिंबू सरबत बनवताना नेहमी पारंपारिक पद्धतीने बनवतो त्यापेक्षा लिंबू आणि मीठ एकत्र केले आणि मग त्यात पाणी साखर या गोष्टी जर मिसळ्या तर लिंबू सरबत ची चव जास्त छान होते. त्याचप्रमाणे श्रीखंड बनवताना चक्का जो असतो त्याच्यामध्ये जर सुंठ टाकली आणि मग त्याचे श्रीखंड बनवले तर ते श्रीखंड आपल्याला बाधत नाही, कारण इथे अम्ल क्षार सिंद्धांत काम करतो.
अम्ल आणि क्षार म्हणजे काय ?
आम्लता आणि क्षारता या दोन गोष्टी आयुर्वेदा मध्ये सांगितलेल्या आहेत त्याविषयी आपण माहिती पाहू. ढोबळमानाने आपल्याला शाळेत माहित असते की acid आणि alkali या दोन गोष्टी ज्यावेळेस एकत्र येतात तेव्हा त्यातून reaction होते आणि neutral असा pH असलेला घटक त्यातून तयार होतो तर हे ढोबळ उदाहरण परिपूर्ण नाही, परंतु साधारणतः हे आपण वापरू शकतो व त्यातून आम्ल क्षार सिंद्धांत समजून घेऊ शकतो. तर याची मूळ उत्पप्ती आयुर्वेदामध्ये मद्यपान मुळे शरीरावर झालेले परिणाम घालवण्यासाठी वेगवेगळे क्षार वर्णन केले आहेत त्यातून या सिंद्धांताची सुरुवात गुरुवर्य कै. आत्माराम वामन दातार शास्त्री नी केली. पांचभौतिक चिकीत्सेतील आम्ल क्षार सिद्धांत हे प्रकृती ठरवणे, औषधे निर्माण करणे किंवा रोगाची सम्प्राप्ति मांडणे त्याप्रमाणे ऋतुचर्या, दिनचर्या या सर्व गोष्टींमध्ये हा सिंद्धांत आपल्याला अत्यंत उपयुक्त ठरतो तर त्याची आपण माहिती पाहूया.
थोडक्यात आम्लता म्हणजे ज्यामध्ये द्रवत्व जास्त असते किंवा ज्यामध्ये पृथ्वी आणि आपमहाभूताचे गुण जास्त असतात आणि तेज महाभुत अल्प प्रमाणात असते असा जो पदार्थ असतो तो आम्लधर्मी समजला जातो आणि ज्याच्यामध्ये पाचन हा गुण जास्त आहे, किंवा उष्णता तीक्ष्णता असे गुण जास्त आहेत हा क्षार धर्मी समजला जातो. त्याच्यामध्ये द्रवत्व कमी असते. तर आपल्या शरीरासाठी उत्तम आरोग्यासाठी आम्ल आणि क्षार या दोन्ही तत्वांची जरुरी असते आणि त्यांचे एकत्रीकरण योग्य प्रमाणामध्ये जेव्हा होईल तेव्हा आपल्याला उत्तम आरोग्य लाभते. आम्ल आणि क्षार यांच्या एकत्रीकरणातून एक प्रकारचे माधुर्य तयार होते कि जे आपल्या शरीराला उत्तम बल, स्थैर्य, रोगप्रतिकारशक्ती देत असते.
आयुर्वेद आणि आम्ल-क्षार सिद्धांत:
प्रकृती आम्ल क्षार सिंद्धांतांनुसार ठरवावी हा आयुर्वेदामध्ये आदेश आहे. तर ज्या व्यक्तींचा रक्तधातू मातेच्या उदरामध्ये असताना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यामध्ये झालेला असतो त्यांची प्रकृती ही आम्लधर्मीय असते आणि ज्या व्यक्तींचा रक्तधातू मातेच्या उदरामध्ये असताना मार्च, एप्रिल, मे महिन्यामध्ये झालेले असतील तर त्यांची प्रकृती हि क्षारधर्मीय असते . याचा उपयोग चिकित्सा करताना आपल्या वैद्याला होत असतो. त्याचप्रमाणे आम्लधर्मीय प्रकृती आणि क्षारधर्मीय प्रकृती या जर समजल्या तर त्या व्यक्तीला कुठले घरगुती पदार्थ हे जास्त खायला परवानगी द्यावी, कुठले पदार्थ त्याने सिमीत करावे हा पथ्य आणि अपथ्य विचार यातून चांगला लक्षात येतो. तर उदाहरण द्यायचे झाले तर ज्यांची आम्लधर्मीय प्रकृती असते त्याला नेहमी विपरीत इचछा म्हणजे आम्लधर्मच्या विपरीत म्हणजे क्षारधर्म, तर त्या व्यक्तीला नेहमी मीठ जास्त लागणे किंवा मिरची, तिखट, मसालेदार , चटपटीत पदार्थ खायची जास्त आवड असते, त्यांना चहा ही गोष्ट जास्त आवडते तर ज्यांची क्षारधर्मी प्रकृती असते त्या लोकांना ताक, भात, किंवा लिंबूसरबत, पाणीदार पदार्थ किंवा थंड पदार्थ किंवा सरबत यांची आवड जास्त असते.
अधिक माहितीसाठी आणि उपचार पद्धतींसाठी आमचा माहितीपूर्ण व्हिडिओ पहा
आम्ल आणि क्षार यांचे शरीरातील कार्य:
वेगवेगळया प्रकारचे जे दुग्धवर्ग जसे की दूध, ताक, दही या सगळ्या गोष्टी त्याचप्रमाणे आपण पीत असलेले पाणी, अनेक प्रकारची फळे, आमसूल, चिंच, या सगळ्या गोष्टी आम्लधर्मीय पदार्थांमध्ये येतात, तर मिरची, लसूण, आले, मसाल्याचे पदार्थ, मोहरी इ. सगळ्या गोष्टी क्षार धर्मा मध्ये येतात. तर आपल्या आहारामध्ये नेहमी या दोन्ही गोष्टींचे संतुलन असले म्हणजे आपली प्रकृती उत्तम राहते
चिकित्सेतील उदाहरण द्यायचे झाले तर जास्त दूध पिल्यामुळे जर जुलाब चालू झाले तर आम्लधर्म हा शरीरामध्ये वाढलेला असतो आणि त्यावेळेस क्षारधर्मीय चिकित्सा ही वैद्याला करावी लागते. म्हणून सुंठी सारखं औषध जर वापरले तर तर हा आजार बरा होतो. त्याचप्रमाणे उलट बघायला गेले तर मसालेदार गोष्टी खाल्यामुळे छातीत जळजळ होणे, पित्त वाढणे यासारख्या गोष्टींमध्ये क्षार धर्मीच्या विरुद्ध काम करणारा आम्ल धर्म जो असतो त्यासाठी ज्येष्ठमधासारखे औषध किंवा सुवर्ण गैरीक सारखं औषध वापरले तर तो आजार जातो. यापद्धतीने तारक मारक विचार हा आम्ल आणि क्षार धर्मीच्या माध्यमातून केला जातो.
सृष्टीचे पण तसेच आहे.आपण जेव्हा ऋतूंचा विचार करतो तेव्हा ग्रीष्म ऋतू मध्ये क्षार धर्म जास्त असतो, त्यानंतर वर्षा ऋतूमध्ये आम्ल धर्म जास्त असतो, पुन्हा शरद ऋतू मध्ये उष्णता वाढते, नंतर आरोग्यदायक असा हेमंत आणि शिशीर ऋतू असतो. त्यानंतर पुन्हा उन्हाळा सुरु होतो. तर या पद्धतीने आम्ल आणि क्षार हे एकापाठोपाठ येतात आणि सृष्टीचे आणि पर्यायाने सर्व जीवसृष्टीचे देखील पालन पोषण या आम्ल क्षार सिद्धांताच्या आधारे होत असते.
आयुर्वेदाचा मुख्य हेतू हा स्वास्थ टिकवणे हा आहे, आणि ते जर आपल्याला व्यवस्थित टिकवायचे असेल तर आम्ल आणि क्षार सिद्धांताची माहिती ही आपण करून घ्यावी, आपल्या वैद्याकडून आपली प्रकृती तपासून घ्यावी, आणि त्याप्रमाणे आपल्या आहारविहारमध्ये केलेले बदल हे आपल्याला स्वास्थ देण्यासाठी नक्की उपयुक्त ठरू शकतात.
अधिक माहितीसाठी Dr. Manoj Deshpande यांना त्वरीत संपर्क करा आणि आमच्या सर्वसमावेशक उपचार पर्यायांबद्दल अधिक माहितीसाठी किंवा पुण्यातील सर्वोत्तम आयुर्वेदिक डॉक्टरांच्या भेटीची विनंती करण्यासाठी, +91 9422068682 / +919764837167 / 02024480625 वर कॉल करा किंवा अपॉइंटमेंट बुक करा वर क्लिक करा.