Tips for psychological wellbeing by Dr Manoj Deshpande

◆ पराकोटीचा उपभोगवाद, तथाकथित फास्ट लाईफस्टाईल, स्वकेंद्रित विचारसरणी, जीवघेणी स्पर्धा, इंटरनेट – सोशल मीडियाचा अत्यधिक वापर यामुळे सध्या मानसिक ताणतणाव, नैराश्य, चिंता,, निद्रानाश हे विकार मोठ्या प्रमाणावर बोकाळले आहेत.
आजकाल दवाखान्यातही सकृतदर्शनी शारीरिक दिसणाऱ्या अनेक विकारांचे मूळ हे अस्वस्थ मनःस्थिती, ताणतणाव यातच दिसून येते. वैद्यकशास्त्रात अशा मनोकायिक आजारांची( Psycosomatic disorders) मोठी यादी आहे. उदा. निद्रानाश, डोकेदुखी, अपचन, रक्तदाब , मधुमेह, थायरॉईड, स्थौल्य, कँसर, पाठ कंबर दुखी, अंग दुखी, सोरायसिस, इसब इ. अनेक अनेक त्वचा विकार इ.
म्हणूनच मनस्वास्थ्य हे उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आहे असे म्हंटले तर अतिशयोक्ती ठरू नये.